breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोरोना विषाणू कसा आला? WHOच्या संशोधकांकडून महत्त्वपूर्ण अहवाल

बीजिंग – चीनच्या वुहान शहरातून कोरोना विषाणूची उत्पत्ती झाली आणि जगभर या विषाणूचा संसर्ग पसरला, असं सुरुवातीला म्हटलं जात होतं. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या अहवालात हा विषाणू आधी प्राण्यांना झाला आणि प्राण्यांपासून मानवाला झाल्याचं म्हटलं आहे. शिवाय, चीनच्या प्रयोगशाळेतून हा विषाणू पसरला असण्याचीही शक्यता कमी असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. कोविड-19 च्या उगमाचा शोध घेण्यासाठी WHO च्या संशोधकांच्या टीमने चीनचा  दौराही केला. यानंतरच्या अभ्यासानुसार कोरोनाचा विषाणू आधी वटवाघळातून इतर प्राण्यांमध्ये केला आणि नंतर माणसात संसर्ग झाला.

कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून संपूर्ण जगाने चीनला जबाबदार धरलं. यासाठी सर्वात आधी वुहानमध्ये कोरोना रुग्ण आढळल्याचा युक्तीवाद करण्यात आला. डिसेंबर 2019 मध्ये पहिला रुग्ण सापडल्यानंतर कोरोनाने जगभरात हातपाय पसरले. दुसरीकडे चीनने जगाला कोरोनाबाबत माहिती देण्यास उशीर केल्याचाही आरोप झाला. चीनने मात्र हे आरोप फेटाळले होते. तसेच हा विषाणू समुद्री अन्नातून चीनमध्ये आल्याचं सांगितलं. यानंतर WHO चं पथकाने चीनच्या या दाव्याची तपासणी करण्यासाठी चीनमध्ये जाऊन पाहणी केली.

WHO चा अहवाल उशीराने प्रकाशित झाल्यानेही चीनवर संशय

एपी या वृत्तसंस्थेला मिळालेल्या WHO च्या अहवालात अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली नसल्याचंही नमूद करण्यात आलंय. म्हणूनच त्याचा तपास करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. या पथकाने प्रयोगशाळेतून विषाणू संसर्ग लीक झाल्याचा मुद्दा सोडून इतर अनेक मुद्द्यांवर सखोल तपासाची शिफारस केली आहे. हा अहवाल उशिराने प्रकाशित झाल्याने चीनने अहवाल प्रभावित करण्यासाठी उशीर केल्याचा आरोपही झाला.

कोरोना विषाणू पसरण्याबाबत अहवालात काय?

संशोधकांनी केलेल्या अभ्यासानंतर असा निष्कर्ष काढलाय, “कोरोना विषाणूचा संसर्ग वटवाघळातून अन्य एका प्राण्यात आणि तेथून माणसात होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. या संशोधनात वटवाघळातून माणसात संसर्ग होण्याच्या शक्यतेचा अभ्यास करण्यात आला. यात कोल्ड चेन फूड प्रोडक्ट्सच्या माध्यमातून विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता आहे. मात्र, तसं होण्याची शक्यता फार कमी आहे. हा विषाणू पसरण्यास कारण ठरणारे घटक वटवाघळात आहेत. मात्र, वटवाघळातील हे घटक आणि कोरोना विषाणूत सापडलेले घटक यात अनेक दशकांचा फरक आहे. त्यामुळे या दोघांमध्ये आणखी एक कडी असल्याचा अंदाज आहे.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button