हेलिकॉप्टर दुर्घटना; 14 पैकी 13 जणांचा मृत्यू
![Helicopter crash; Thirteen of the 14 died](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/WhatsApp_Image_2021_12_08_at_2_52_52_PM-1.jpeg)
बंगळुरु – भारताचे सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. तामिळनाडुत ही दुर्घटना घडली. १४ जण या हेलिकॉप्टरमध्ये होते. तामिळनाडूतल्या कुन्नूर परिसरात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. सीडीएस बिपीन रावत यांच्यासह पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि आयएएफ पायलट यांच्यासह एकूण 14 लोक हेलिकॉप्टरमध्ये होते. सीडीएस बिपिन रावत हे गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हेलिकॉप्टर दुर्घटनेत १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.तामिळनाडूतल्या कुन्नूर परिसरात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. त्या घटनेचे प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार,भारताचे सीडीएस बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर तमिळनाडूमध्ये कोसळले आहे. यामध्ये एकूण १४ जण बसलेले होते. यामध्ये सीडीएस बीपिन राव हे जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे क्रॅश झालेले हेलिकॉप्टर Mi-17V5 आहे. त्याचेच वैशिष्ट आज आपण जाणून घेणार आहोत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली आहे. यासंदर्भात राजनाथ सिंह सविस्तर माहिती उद्या संसदेत देतील असेही समजते.राज्यसभेचं कामकाज उद्या म्हणजेच ९ डिसेंबर २०२१ पर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.तामिळनाडुचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन हे घटनास्थळी जाणार आहेत. तसंच स्थानिक प्रशासनाला यासंदर्भात सूचना दिल्या असून आवश्यक ती मदत घटनास्थळी पोहोचवली जात आहेत.
राष्ट्रपतींचा कार्यक्रम रद्द
महाराष्ट्रात राजभवन येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या दरबार हॉल चे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांच्या हस्ते होणार होते. मात्र तामिळनाडू येथे हेलिकॉप्टर दुर्घटना झाल्याने त्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. याबाबतची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली आहे.
सीडीएस बिपिन रावत यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पोहोचले होते. त्यानंतर राजनाथ सिंह लोकसभेत बोलणार आहेत. दरम्यान, कर्नाटकचे वनमंत्री के रामचंद्रन यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जणांचा मृत्यू झाला असून २ गंभीर असल्याची माहिती दिली आहे.
सीडीएस बिपन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत. या हेलिकॉप्टरमधून रावत यांच्या पत्नीसह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. तसंच हेलिकॉप्टरला लागलेली आग आटोक्यात आणण्याचं काम सुरु आहे.
Latest visuals from the spot (between Coimbatore and Sulur) where a military chopper crashed in Tamil Nadu. CDS Bipin Rawat, his staff and some family members were in the chopper.
(Pics Source: Locals involved in search and rescue operation) pic.twitter.com/miALr88sm1
— ANI (@ANI) December 8, 2021
लष्कराचं हेलिकॉप्टर कून्नूर इथं क्रॅश झालं आहे. यात जिवितहानीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत हे हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्यांमध्ये होते असं म्हटलं जात आहे. हवामानामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिपिन रावत यांच्या पत्नीसुद्धा या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होत्या अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.