breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

कडाक्याच्या उन्हात आनंदाची बातमी, ‘मान्सून’बाबत IMDकडून महत्वाची अपडेट

IMD Weather Forecast on Monsoon : उष्णतेने त्रस्त असलेले लोक मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. अर्ध्याहून अधिक भारतामध्ये उष्णतेची लाट कायम आहे. अशा स्थितीत प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की मान्सून कधी येणार? भारतीय हवामान खात्याने (IMD) या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. हवामान खात्यानुसार मान्सून लवकरच केरळमध्ये दाखल होणार आहे.

आयएमडीनुसार, मान्सूनचे वारे सध्या दक्षिण अरबी समुद्र आणि मालदीवमध्ये पोहोचले आहेत. अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत मान्सून केरळमध्ये वेळेपूर्वी पोहोचणे अपेक्षित आहे. मान्सून लक्षद्वीपमार्गे दक्षिण अरबी समुद्र आणि मालदीवमार्गे केरळमध्ये दाखल होईल.

हेही वाचा – अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

आयएमडीने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून मान्सूनची माहिती दिली आहे. त्यानुसार 31 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो. पुढे सरकताना मान्सून ईशान्य भारतातील राज्यांमध्येही अवघ्या 3-4 दिवसांत पोहोचेल. यासोबतच मेघालय आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. याशिवाय आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम, केरळ येथे मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात 10 -11 जून दरम्यान मान्सून दाखल होईल.

एकीकडे देशात कडक उन्हाचा तडाखा बसत असताना, दुसरीकडे मान्सूनही जोरदार बरसणार आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, यावेळी सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. पॅसिफिक महासागरातील ला निनामुळे मान्सून मजबूत झाला आहे. त्यामुळेच यंदा मान्सून भारताच्या दिशेने वेगाने सरकत आहे. साधारणपणे 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचतो. मात्र यावेळी मान्सून एक दिवस आधीच केरळमध्ये दाखल होणार आहे. ईशान्य भारत व्यापल्यानंतर मान्सूनचे वारे उत्तर भारत आणि मध्य भारताकडे सरकतील. अशा परिस्थितीत जूनच्या अखेरीस मान्सून संपूर्ण भारत व्यापून टाकीन.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button