केंद्रातील शपथविधीपूर्वी सोन्याच्या किमती झाल्या कमी; जाणून घ्या आजचे दर
![Gold prices ease ahead of Centre's swearing-in](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Gold-Silver-Rate-780x470.jpg)
Gold Silver Rate | केंद्रामध्ये सत्ता स्थापन्याच्या हालचालींना वेग आला आहे. उद्या दिल्लीत शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. अशातच आज सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. या आठवड्यात सोने १७०० रुपयांनी कमी झाले आहे.
गुडरिटर्न्सनुसार, आता २२ कॅरेट सोने ६७,७५० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७३,९०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. याशिवाय या आठवड्यात चांदी देखील कमी झाली आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव ९६,००० रुपये आहे. त्यामुळे केंद्रातील शपथविधीपूर्वी सोन्या चांदीच्या किंमती कमी झाल्याचे दिसत आहे.
हेही वाचा – ‘विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन पाडेन’; मनोज जरांगेंचा इशारा
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने उतरले तर चांदी वधारली. २४ कॅरेट सोने ७१,९१३ रुपये, २३ कॅरेट ७१,६२५ रुपये, २२ कॅरेट सोने ६५,८७२ रुपये झाले. १८ कॅरेट ५३,९३५ रुपये, १४ कॅरेट सोने ४२,०६९ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव ९०,५३५ रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.