TOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

मागे जाऊन खा, शिवराजसिंह चौहानांना पंतप्रधानांनी भर व्यासपीठावर झापलं

शिवराजसिंह चौहान यांची उडाली चांगलीच भांबेरी

उज्जैन ।

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी भर व्यासपीठावर लपवून काहीतरी खाल्लं. महत्त्वाचं म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना खाताना रंगेहाथ पकडलं. पाठीमागे जाऊन खा, असं मोदींनी सांगतानाच शिवराजसिंह चौहान यांची चांगलीच भांबेरी उडाली. काही कळायच्या आतच ते आपल्या जागेवरून उठले आणि व्यासपीठामागे गेले.

हा हास्यास्पद प्रकार घडला आहे मंगळवारी उज्जैन येथे झालेल्या श्री महाकाल लोकच्या लोकार्पण सोहळ्यात. यावेळी संपूर्ण वातावर भक्तीच्या गंगेत न्हाईन निघालं होतं. या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवराजसिंह चौहान एकाच व्यासपीठावर एकमेकांच्या बाजूला बसले होते.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान मंगळवारी दिवसभर उज्जैनमध्ये होते. सकाळपासून ते मंदिर परिसरात होते. चिंतामण गणेश, गढकालका देवी यांचं दर्शन घेतलं. शिप्रावर ओढणी चढवली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यावर ते पुन्हा व्यस्त झाले. त्यामुळे कदाचित त्यांना जेवणाकरता वेळ मिळाला नसेल. त्यामुळे व्यासपीठावर मोकळा वेळ मिळाला तेव्हा त्यांनी खिशातून काहीतरी काढलं. मात्र, चोरुन खाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष गेलं. त्यांनी हळूच आवाजात बाहेर जाऊन खा, अशी सूचना केली. खुद्द पंतप्रधानांनी आपल्याला पकडल्याने भितीने त्यांचं तोंड उघडच्या उघडं राहिलं. आणि भांबवलेल्या अवस्थेतच त्यांनी व्यासपीठ सोडलं.

ज्येष्ठ पत्रकार प्रवीण दुबे यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना भूक लागली होती. उज्जैनमध्ये त्यांनी लोकांची नजर लपवून पिस्ता खाऊ लागले. पण तेवढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नजर पडली, तेव्हा त्यांची भांबेरी उडाली. ज्यांनी कोणी व्हिडीओ बनवला आहे, त्यांना २१ तोफांची सलामी, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button