गीता गोपीनाथ आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदाचा राजीनामा देणार
![Geeta Gopinath to resign as IMF chief economist](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/images-3-2.jpeg)
वाशिंगटन – अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञपदाचा येत्या जानेवारी महिन्यात राजीनामा देणार आहेत. याबाबत आंतराराष्ट्रीय नाणेनिधीने पत्रक जारी करून माहिती दिली असून गीता या परत हार्वर्ड विद्यापीठात जाणार आहेत. त्यांचा जन्म म्हैसूरचा असून त्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ पदावर २०१९ मध्ये रुजू झाल्या होत्या.
त्यापूर्वी त्या हॉर्वर्ड विद्यापीठात जॉन झ्वान्स्त्र आंतरराष्ट्रीय अभ्यास आणि अर्थशास्त्राच्या प्राध्यापक होत्या. हॉवर्डने त्यांना एक वर्ष रजा वाढवून ३ वर्ष आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये सेवा देण्याची संधी दिली होती. आता आयएमएफचे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांनी गीता यांच्यानंतर यापदासाठी लवकरच कर्मचाऱ्याचा शोध घेतला जाणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच गीता यांच्या कामाचे कौतुक देखील केले आहे. कोरोना महामारीच्या काळात गीता यांनी महत्वपूर्ण विश्लेषणाचे काम केले असून आयएमएफच्या सर्वोच्च अर्थतज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
गीता यांचे योगदान खरोखर उल्लेखनीय आहे. आंतरराष्ट्रीय वित्त आणि मॅक्रोइकॉनॉमिक्सच्या त्याच्या सखोल आकलनाचा आम्हाला खूप फायदा झाला, असेही क्रिस्टलिना म्हणाल्या.