ताज्या घडामोडीराष्ट्रिय
इंधन दरवाढ सुरूच! पेट्रोल ७०, डिझेल ८० पैसे लिटरने महागले
![Fuel price hike continues! Petrol became more expensive by 70 paise and diesel by 80 paise per liter](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Petrol-Diesel-2.jpg)
नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची दरवाढ सुरू आहे. त्यामुळे भारतीय तेल कंपन्यांनी आज पुन्हा इंधन दरवाढ केली. त्यात पेट्रोल ७० पैसे आणि डिझेल ८० पैसे लिटरने महागले. यामुळे ५ दिवसांत पेट्रोल आणि डिझेल ३.१० रुपयांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोल ८४ पैशांनी महागल्यामुळे ते ११३ रुपये ३५ पैसे आणि डिझेल ९७ रुपये ५५ पैसे लिटर झाले आहे.
भारतीय तेल कंपन्यांनी आज सकाळी इंधनाचे सुधारित दर जाहीर केले. त्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल ९८ रुपये ६१ पैसे आणि डिझेल ८९ रुपये ८७ पैसे लिटर झाले आहे. कोलकात्यात पेट्रोल १०८ रुपये ०१ पैसे आणि डिझेल ९३ रुपये ०१ पैसे लिटर झाले. तर चेन्नईत पेट्रोल ७६ पैशांनी महागले आहे.