breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

१ जुलैपासून ‘या’ कारच्या किंमतीमध्ये होणार १७,५०० रुपयांची वाढ

देशातील Citroen India हि एक आघाडीची वाहन उत्पादक कंपनी आहे. Citroen India कंपनीने मागील वर्षी जुलै २०२२ मध्ये आपली न्यू C३ लाँच केली होती. मात्र आता कंपनीने या गाडीच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. Citroen C३ या कारच्या किंमतीमध्ये कंपनीने १ जुलै पासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जुलै २०२३ पासून या गाडीची किंमत १७,५०० रुपयांनी वाढणार आहे.

Citroen C3 ही कार कंपनीने तीन ट्रिम पर्यायांमध्ये लाँच केली होती. या कारच्या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत ६.१६ लाखांपासून ते ७.८७ लाखांपर्यंत आहे. तर टर्बो पेट्रोल व्हेरिएंटची किंमत ८.२८ लाखांपासून ८.९२ लाखांपर्यंत आहे. आता १ जुलै २०२३ पासून प्रत्येक व्हेरिएंटनुसार या गाडीची किंमत १७,५०० रुपयांनी वाढणार आहे.

हेही वाचा – राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा ब्रीजभूषण सिंह यांच्या विरोधात कँडल मोर्चा

जून २०२३ : Citroen C३ च्या व्हेरिएंटनुसार असणाऱ्या किंमती : 

टर्बो पेट्रोल व्हेरिएंटच्या किंमती :

१.२ P Turbo Feel Dual Tone : Rs ८.२८ lakh
१.२ P Turbo Feel Dual Tone Vibe Pack : Rs ८.४३ lakh
१.२ P Turbo Shine Dual Tone : Rs ८.८० lakh
१.२ P Turbo Shine Dual Tone Vibe Pack : ८.९२ lakh

पेट्रोल व्हेरिएंटच्या किंमती :

१.२ P Live : Rs ६.१६ lakh
१.२ P Feel : Rs ७.०८ lakh
१.२ P Feel Vibe Pack : Rs ७.२३ lakh
१.२ P Feel Dual Tone : Rs ७.२३ lakh
1.2P Feel Dual Tone Vibe Pack : Rs ७.३८ lakh
१.२ P Shine : Rs ७.६० lakh
१.२ P Shine Vibe Pack : Rs ७.७२ lakh
१.२ P Shine Dual Tone : Rs ७.७५ lakh
१.२ P Shine Dual Tone Vibe Pack : Rs ७.८७ lakh

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button