breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

जगात सर्वप्रथम मास्कमुक्ती करणाऱ्या इस्रायलमध्ये पुन्हा मास्कची सक्ती

जेरुसलेम – कोरोनाचा संसर्ग अटोक्यात आल्याने इस्त्रायलमध्ये सर्वांत आधी मास्कमुक्ती करण्यात आली होती. मात्र आता तिथेही डेल्टाच्या नव्या अवताराचा संसर्ग वाढल्याने पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आली आहे. जगातील अनेक देशांमध्ये पसरत असलेल्या डेल्टाचे काही रुग्ण इस्त्रायलमध्येही आढळले आहेत. त्यामुळे इस्त्रायल सरकारने आता सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आदेश जारी केले आहेत.

इस्त्रायलमध्ये कोरोना अटोक्यात आल्यानंतरही पुन्हा एकदा तिकडे संसर्ग वेगाने फैलावत आहे. तेथे अनेकांचे लसीकरण झाल्याने मास्कमुक्ती करण्यात आली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्या नागरिकांमुळे डेल्टा व्हायरस इस्त्रायलमध्ये आल्याचे पंतप्रधान नफ्ताली यांनी म्हटले आहे. त्यामुळे विमानतळावर यापुढे कोरोना चाचणी आणि विलगीकरण यांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर अन्य देशातील नागरिकांना देशात बंदी करण्यात आली आहे. कोरोनाचा डेल्टा व्हायरस हा सर्वप्रथम भारतात आढळला आणि त्यानंतर तो जगभर पसरला. या व्हायरसची सर्वांनाच भीती वाटत आहे . दरम्यान, इस्त्रायलमध्ये बहुतांश नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र लस घेतलेल्या नागरिकांनाही डेल्टा व्हायरसची लागण होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. इस्त्रायलमध्ये आतापर्यंत ८ लाख ४० हजार २२५ नागरिकांना कोरोना झाला. त्यापैकी ६४२८ जणांचा मृत्यू झाला आहे.

या देशात एकाच दिवसात १०० पेक्षा अधिक कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे सर्व सार्वजनिक ठिकाणांवर मास्क वापरणे आता बंधनकारक करण्यात येत असल्याची घोषणा कोरोना टास्कफोर्सचे प्रमुख नचमन ऐश यांनी इस्त्रायली सरकारी रेडिओ केंद्रावरून केली. इस्त्रायलमधील कोरोना नियंत्रणात आल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याची सक्तीदेखील हटवण्यात आली होती.मात्र १८ वर्षांखालील नागरिकांचे लसीकरण झालेले नसल्यामुळे त्यांना डेल्टा व्हेरिअंटचा अधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लसीकरणावर भर देण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button