Breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ विभाग

खतांच्या भरमसाट दरवाढीविरोधात छावा क्रांतिवीर सेनेचे येवल्यात आंदोलन

केंद्र सरकारच्या क्रूर चेष्टेचा निषेध!

येवला : केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या दरात केलेल्या भरमसाट वाढीविरोधात सोमवारी (ता.२७) येथे छावा क्रांतिवीर सेनेतर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने सहभागी होत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. सरकार एकीकडे जीएसटी महोत्सव साजरा करते अन दुसरीकडे खतांचे दर वाढवते, ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला.

शेतकऱ्यांनी छावा क्रांतिवीर सेना आणि जय जवान, जय किसान, जय शिवराय या संघटनांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकराला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नगर- मनमाड राष्ट्रीय मार्गावर आंदोलन करत शासनाचा निषेध व्यक्त केला. छावाचे जिल्हाध्यक्ष गोरख संत आणि प्रफुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनामुळे सुमारे एक ते दीड तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

केंद्र व राज्य शासनाच्या फसव्या घोषणांचा निषेध असो, बळीराजाचा विजय असो, फसव्या जीएसटी उत्सवाचा निषेध असो अशा घोषणा देत संतप्त शेतकरी बाजार समिती कार्यालयासमोर जमा झाल्यानंतर एकत्रित नगर – मनमाड मार्गावर रास्ता रोको करण्यासाठी जमले. शेकडो शेतकरी आंदोलनात केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देत सामील झाले.

सोयाबीन, मका, कापूस यासारख्या पिकांचे भाव वाढले नसतानाही सरकारने शेतीसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक खताच्या गोणीमागे तब्बल २०० ते ३०० इतकी दरवाढ केली. यामुळे एकीकडे जीएसटी कमी केल्याचा उत्सव साजरा करायला लावतात आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना खताच्या प्रत्येक गोण्यांवर २०० ते ३०० दरवाढ केले आहेत असा संताप शेतकरी व्यक्त करत होते. पूर्ण वर्ष वाया गेले आहे, औषधांचे आणि खतांचे भाव वाढले, पण शेतकऱ्याच्या मालाला भावच नाही.

हेही वाचा –  पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून राष्ट्रविकासाचा संदेश – दिनेश यादव

शेतीमालाला भाव नाही, मग शेतीला उपयोगी रासायनिक खते आणि औषधींचे भाव वाढ काय़ असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला. सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत वाढ करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची तक्रार करत दुसरीकडे शेतीमालाच्या भावांमध्ये वाढ करत नसल्याचा आरोप गोरख संत व प्रफुल्ल गायकवाड यांनी केला. अतिवृष्टीने तर सर्व धुवून नेले असून आणखी काल रविवारी रात्री झालेल्या पावलाने आणखी काय राहिले आहे असा सवाल गोरख संत यांनी केला.

रास्ता रोको सुरू असताना शेतकऱ्यांनी सरकारी अधिकारी येऊन आमचे निवेदन स्वीकारत नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलनस्थळावरून उठणार नाही अशी भूमिका घेतली. शेतकऱ्याला कोणी वाली नाही, असा उद्विग्न सूर आंदोलकांनी लावला. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, ज्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.

यामध्ये आंदोलकांची व पोलिसाची शाब्दिक बाचाबाचीही झाली, पण निवेदन घेण्यासाठी शासनाचा कोणीतरी प्रतिनिधी यावा ही मागणी करत आंदोलक चिडले होते. पोलिसांच्या मध्यस्थीने दीड तासाने हे आंदोलन थांबून तहसीलदार आबा महाजन आंदोलनस्थळी आल्यानंतर त्यांना निवेदन दिले. संघटनेचे गोरख संत, प्रफुल गायकवाड, विजय मोरे, सोपान लांडगे, संदीप पवार, वैभव भड, प्रिया वर्पे, गोरख सांबरे, गोरख कोटमे, गणेश कदम आदींसह शेतकरी सामील झाले होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button