Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

युरोपियन युनियनकडून एलॉन मस्क यांच्या ‘X’ ला १४० दशलक्ष डॉलर्सचा दंड

Elon Musk | एलॉन मस्क यांच्या मालकीचे सोशल नेटवर्क ‘X’ युरोपियन युनियनच्या डिजिटल सेवा कायद्याचे (DSA) उल्लंघन केल्याबद्दल अडचणीत आले असून, १४० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. DSA अंतर्गत प्रथमच इतका मोठा दंड आकारण्यात आला आहे.

युरोपियन कमिशनच्या माहितीनुसार, पेड ‘ब्लू टिक’ फीचरमुळे युजर्सची दिशाभूल झाली, तसेच एक्सने संशोधकांना आवश्यक डेटा न देणे आणि जाहिरात-संग्रहाचे योग्य व्यवस्थापन न करणे ही गंभीर त्रुटी आढळून आल्या. या पार्श्वभूमीवर कमिशनने दंडासह सुधारणा करण्याची सक्ती केली आहे.

युरोपियन युनियनने कंपनीला ६० दिवसांत त्रुटींवर उपाययोजना तयार करण्यास आणि ९० दिवसांत त्यांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा एक्सवर अतिरिक्त दंड आकारला जाऊ शकतो, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

हेही वाचा      :        “पंतप्रधानपदाची स्वप्नं कधी-कधी बाबांनाही पडत असावीत”; मुख्यमंत्री फडणवीसांचा पृथ्वीराज चव्हाणांना टोला 

अमेरिकेतून तीव्र प्रतिक्रिया

या निर्णयावर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले, “१४० दशलक्ष डॉलर्सचा दंड हा केवळ ‘X’वरील हल्ला नाही, तर सर्व अमेरिकन टेक प्लॅटफॉर्म्सवर परदेशी सरकारांनी केलेला हल्ला आहे. अमेरिकन लोकांवरील ऑनलाइन सेन्सॉरशिपचे दिवस आता संपले आहेत.”

मस्क यांची तब्बल ४६७ अब्ज डॉलर्सची संपत्ती लक्षात घेता हा दंड आर्थिकदृष्ट्या किरकोळ मानला जात असला, तरी युरोप–अमेरिका तणाव वाढण्याची आणि भाषण स्वातंत्र्य विरुद्ध तंत्रज्ञान नियमन या वादाला अधिक तीव्रता मिळण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button