Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तक

शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अजित पवारांना श्रद्धांजली!

आठवणींचा उजाळा: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने शोकसभेचे आयोजन

पुणे | महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांना पुण्यातील शैक्षणिक संस्थांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिरात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने मराठवाडा मित्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेस शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदम यांनी अजित दादांनी शेवटच्या श्वासापर्यंत लोकांच्या कल्याणासाठी काम केले. समाजासाठी मोठे काम करणाऱ्या महापुरुषांच्या अल्पायुष्य लाभले त्या प्रमाणे दादांनाही अल्पायुष्य लाभले. दादांच्या आचार विचाराप्रमाणे आपणही काम केले पाहिजे तीच खरी आदरांजली ठरेल. असे सांगितले. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी दादांचे शिक्षण क्षेत्रातील योगदानाचे उत्तम उदाहरण म्हणजे बारामतीची विद्याप्रतिष्ठान आहे. राजकीय नेता कसा याचे उदाहरण म्हणून अजित दादा पवार कायम स्मरणात राहतील, असे सांगितले.

या प्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत, एमआयटी शिक्षण संस्थेचे राहुल कराड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर, एमकेसीएलचे संचालक डॉ. विवेक सावंत, शिरूर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार निकम, आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, फ्लेम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जगदीश कदम, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे सचिव प्रमिला गायकवाड, माजी सहायक शिक्षण आयुक्त अनिल गुंजाळ, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ, के. जे. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष के. जे. जाधव, तंत्र शिक्षण संचालयाचे धनपाल कांबळे, माजी आमदार विलास लांडे, पुरंदर तालुका शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सतीश उरसळ, डेक्कन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आबा राऊत, प्रवरा शिक्षण मेडिकल संस्थेचे कुलगुरू डॉ. व्ही. एन. भगरे, भारती विद्यापीठाचे सचिव डॉ. महादेव सगरे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब शिंदे, लोकमतचे संपादक संजय आवटे, बी.एम.सी.सी.चे प्रा.प्रशांत साठे,पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आजीव सदस्य जे. एम. डुंबरे, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले, शिवाजी मराठा शिक्षण संस्थेचे गायकवाड, सईबाई स्मारक विश्वस्त समितीचे सदस्य संग्राम कोंडे यांनी भावना व्यक्त केल्या. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा     :            अजित पवार गेले..आणि प्रशासन पुन्हा सुस्तावले!

या प्रसंगी आमदार चेतन तुपे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव डॉ. शंतनू जगदाळे, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे , डॉ. धोंडीराम पवार, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य संगीता जगताप यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षण क्षेत्राला दादांमुळेच प्रोत्साहन : मान्यवरांच्या भावना..

शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एस. के. जैन यांनी पिंपरी चिंचवडचा विकास दादांमुळेच झाला. परदेशी शिक्षण संस्थांच्या आव्हान पेलण्यासाठी दादा सारखे दूरदृष्टीचे सक्षम नेतृत्व होते. असे मत व्यक्त केले.स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी शिक्षण क्षेत्राला मार्गदर्शक होते. दादांनी शिक्षण क्षेत्रात केलेले काम लोकांना माहीत नाही. शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेवर भर देणारे दादा अशी भावना व्यक्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी अजित दादा महाराष्ट्राचे ब्रँड नेते. शिकण्यासाठी पायाभूत सोयीसुविधावर भर दिला. महाराष्ट्राच्या अर्थ संकल्पात शिक्षणासाठी भरीव तरतूद करणारे अर्थ मंत्री होते. असे मत व्यक्त केले. मगरपट्टा सिटीचे संचालक सतीश मगर यांनी बहुजन समाजातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पायाभूत सुविधा सोयीसुविधा उत्तम दर्जाच्या पुरविणे यावर त्यांचा भर होता. असे सांगितले.

दादांचे काम कायम स्मरणात राहील…

प्रोग्रेसिव्ह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे :यांनी दादांना शिक्षण क्षेत्रात रस होता. संस्था चालकांसमोर प्रश्न समजवून घेऊन तो कसा सोडवायचा हे त्यांना माहीत होते. अजितदादा यांच्या नावाने विद्यापीठात अध्यासन सुरु करावे. असे सुचवले. शोकसभेचे अध्यक्ष मराठवाडा मित्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्र भरातील लोकांना जे दुःख झाले आहे ते खूप मोठे आहे. खेड्यापाड्यातील सामान्य माणूस दुःख व्यक्त करत आहे. ‘कामाचा माणूस’ म्हणून दादांविषयी लोक भावना व्यक्त करत आहेत. दादांसारखा नेता पुन्हा होणे नाही. दादांनी लोकांसाठी जे काम केले आहे ते कायम स्मरणात राहील. असे मत व्यक्त केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button