breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

Byju’s च्या कार्यालयावर ईडीची धाड!

Byju : ईडीने आज (ता. २९ एप्रिल) बायजूचे संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन यांच्या बंगळुरूतील तीन ठिकाणी धाड टाकली आहे. ईडीने ही कारवाई फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट (फेमा) च्या तरतुदींनुसार केली आहे. बायजू रवींद्रन आणि त्यांची कंपनी थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडच्या जागेवर छापे टाकण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहीतीनुसार, अधिकार्‍यांनी झडतीदरम्यान आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल डेटा जप्त केला आहे. कंपनीला २०११ ते २०२३ दरम्यान २८,००० कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक (FDI) मिळाली आहे. याशिवाय कंपनीने एफडीआयच्या नावाने विविध देशांना पैसेही पाठवलेले आहेत.

ईडीच्या म्हणण्यानुसार, Byju’s च्या नावाने एडटेक प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या Think and Learn Pvt Ltd कंपनीने जाहिरात आणि विपणन खर्चाच्या नावाखाली सुमारे ९४४ कोटी रुपये खर्च केले होते. कंपनीने आर्थिक वर्ष २०२०-२१ पासून आपले आर्थिक विवरण तयार केले नाही आणि खात्यांचे लेखा परीक्षणदेखील केलेले नाही. त्यामुळे त्याचा तपास सुरू आहे. रवींद्रन यांच्या नावाने अनेक समन्स जारी केले असले तरी ते ईडीला वारंवार टाळत राहिले, ते कधीही हजर झाले नाहीत, असा ईडीचा आरोप आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button