आयफोन १५ वर मिळणार बम्पर डिस्काऊंट, जाणून घ्या किती रुपये वाचणार?
![Discount will be available on iPhone 15, know how much rupees will be saved?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/iphone-15--780x470.jpg)
iphone 15 Discount | प्रत्येकालाच आपल्याकडे आयफोन असावा, असे वाटते. आता आयफोनची किंमत कमी झाली आहे. त्यामुळे आयफोन खरेदी करणाऱ्यांचे हजारो रुपये वाचणार आहेत.ॲपल या कंपनीने गेल्या वर्षी iPhone १५ Series लॉन्च केली होती.
दरम्यान आता ॲपलने iPhone १५ च्या किमतीत घट केली आहे. तुम्हाला iPhone १५ खरेदी करायचा असेल तर तुम्हाला आता कमी पैसे द्यावे लागणार आहेत. ई-कॉमर्स वेबसाईट ॲमेझॉनवर आयफोन १५ वर बम्पर सुट दिली जात आहे. ॲमेझॉन या संकेतस्थळावर iPhone १५ हा ७० हजार ९०० रुपयांना खरेदी करता येणार आहे.
हेही वाचा – यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला अटक
या आयफोनची मूळ किंमत ७९,९०० रुपये आहे. ॲमेझॉनवर तुम्हाला या आयफोनवर ९,००० रुपयांची सुट मिळेल. म्हणजेच आयफोन १५ वर तुम्हाला तब्बल ११ टक्के सुट मिळणार आहे. तुम्ही अगोदरच iPhone वापरत असाल तर एक्स्चेंज ऑफरच्या माध्यमातून तुम्ही आणखी कमी पैशांत नवा आयफोन खरेदी करू शकता.