ताज्या घडामोडीविदर्भ विभाग

उपसभापति नीलम गोऱ्हेंची कठोर भूमिका, डॉक्टर आत्महत्या प्रकरण

पोलिसांना चार्जशीट दाखल करण्याचे निर्देश

सातारा : फलटण तालुक्यातील डॉक्टर युवतीच्या आत्महत्या (Satara Doctor Case) प्रकरणाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सातारा जिल्हा रुग्णालय प्रशासनाला मागील दोन वर्षांचा विशाखा समितीचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश दिले, तसेच सातारा पोलिस अधीक्षक कार्यालयाने या प्रकरणातील चार्जशीट वेळेत दाखल करावे, असे आदेशही दिले.

या प्रकरणातील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीला आयुक्त आरोग्य सेवा डॉ. कादंबरी बलकवडे, आयुक्त सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर हे समक्ष उपस्थित होते, तर दूरदृश्य प्रणालीद्वारे पोलिस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा चिकित्सक डॉ. युवराज कर्पे, फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंशुमन धुमाळ, पुणे विभाग आरोग्य उपसंचालक डॉ. आर. बी. पवार सहभागी झाले होते, तसेच राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या उपस्थित होत्या.

हेही वाचा –  पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुक: प्रारूप मतदार यादी ६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार

फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर युवती या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी होत्या आणि रुग्णालयातील सर्व सहकाऱ्यांशी त्यांचे संबंध चांगले होते. कोणतीही तक्रार त्यांच्याविरुद्ध नव्हती. जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस विभागाने काही अहवाल रुग्णालयाला सादर केले होते, ज्यावर समितीने चौकशी केली. तथापि, कोणतीही विभागीय चौकशी करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी निर्देश दिले, की सातारा जिल्हा रुग्णालयाने आपल्या अखत्यारीतील सर्व रुग्णालयांचा दोन वर्षांचा विशाखा समिती अहवाल तयार करून सादर करावा, तसेच तपासात कोणतीही ढिलाई होऊ नये आणि संबंधितांना न्याय मिळावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button