TOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

दिल्ली मद्य धोरण; ईडीकडून देशभरात ३० ठिकाणी छापेमारी

दिल्ली सरकारच्या मद्य धोरणातील भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने (ED) दिल्ली-एनसीआरसह देशभरात छापेमारी सुरू केली आहे. देशातील ३० ठिकाणी छापेमारी सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दिल्ली सरकारनं जाहीर केलेल्या अबकारी धोरणावर मोठ्या प्रमाणावर भाजपकडून टीका करण्यात येत होती. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीसह लखनऊ, गुरुग्राम, चंदीगड, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरूमध्ये छापेमारी सुरू आहे.

दिल्लीसह देशभरात ३० ठिकाणी छापेमारी

दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात ३० हून अधिक ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर सध्या छापे टाकण्यात आलेले नाहीत. दिल्लीसह उत्तर प्रदेशातील लखनौ, हरियाणातील गुरुग्राम, चंदीगढ मुंबई, हैदराबाद बंगळुरूमध्ये छापेमारी करण्यात येत आहे.

भाजपाकडून स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ जारी

आम आदमी पक्षावर निशाणा साधत भाजपनं सोमवारी एका “स्टिंग ऑपरेशन”चा व्हिडिओ जारी केला होता. ज्यामध्ये कथित दारू घोटाळ्यातील आरोपीचे वडील दिल्लीत दारूचा परवाना घेतल्याचा दावा करताना दिसतात. तसेच, त्यासाठी “कमिशन” दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. पक्षाच्या मुख्यालयात पत्रकारांना संबोधित करताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, “नवीन मद्य धोरणामुळे जी लूट झाली होती, ती आज उघड झाली आहे. पहिली गोष्ट म्हणजे, ८० टक्के नफा दिल्लीतील जनतेच्या खिशातून काढून मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल यांनी कमिशनच्या माध्यमातून आपल्या खिशात टाकला, असा आरोप त्यांनी केला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button