केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २८ टक्क्यांपर्यंत वाढला
![Dearness allowance of central government employees increased to 28 per cent](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/govt-employees-leave-1585293788.jpg)
नवी दिल्ली – देशातील केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना महागाई भत्ता २८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा आदेश केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केला आहे. विशेष म्हणजे हा आदेश १ जुलै २०२१ पासून अंमलात येणार आहे. मात्र हा आदेश रेल्वे कर्मचारी आणि सशस्त्र दलाच्या जवानांना लागू होणार नाही, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. यासाठी संबंधित मंत्रालये स्वतंत्र आदेश काढणार आहेत. केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठीचा महागाई भत्ता १७ वरून २८ टक्के करण्यात आला आहे. या दरवाढीमध्ये शेवटच्या तीन अतिरिक्त हप्त्यांचा समावेश आहे. मागील वर्षाच्या सुरुवातीस ३० जून २०२१ पर्यंत तो १७ टक्के राहील.
वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारा खर्च विभागाने (डिओई) यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. मूळ पगारामध्ये विशेष वेतनासारख्या इतर पगाराचा समावेश होणार नाही. रेल्वे कर्मचारी आणि सशस्त्र दलातील जवानांचे डीए वाढवण्याचा आदेश रेल्वे मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय जारी करेल. केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी जारी केलेला आदेश डिव्हिजन सर्व्हिसेस एस्टिमेटमधून मिळणाऱ्या नागरी कर्मचार्यांनाही लागू असेल.