breaking-newsताज्या घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! सणासुदीत नोकरदारांचा महागाई भत्ता ‘इतका’ वाढणार

7th Pay Commission | केंद्र सरकार दर वर्षी दोनदा महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत सुधारित करते, जी १ जानेवारी आणि १ जुलैपासून लागू केले जाते. कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या AICPI निर्देशांकाच्या अर्धवार्षिक डेटाच्या आधारे महागाई भत्ता जुलैपासून ३ ते ४% वाढण्याची शक्यता आहे.

केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने पुढील महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३% वाढ करणे अपेक्षित आहे, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३% होईल. ण करोना काळात कर्मचाऱ्यांची रोखलेली डीए थकबाकी सोडण्याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही अपडेट समोर आलेले नाही.

हेही वाचा    –      भाजपला मोठा धक्का! कोल्हापूरचे नेते समरजीत घाटगे राशपच्या वाटेवर? 

यापूर्वी जानेवारी २०२४ मध्ये सरकारने महागाई भत्त्यात ४% वाढ केली होती ज्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ५०% झाला. अशा स्थितीत जुलै महिन्यासाठी ३ किंवा ४ टक्के वाढ अपेक्षित आहे. असे झाल्यास आता एखाद्या कर्मचाऱ्याचा मासिक पगार ५० हजार रुपये असेल, तर महागाई भत्ता २ हजार रुपयांनी वाढेल. जुलैमध्ये डीए आणि पगार वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांचे आणखी अनेक भत्ते वाढतील ज्यामुळे त्यांना महागाईपासून मोठा दिलासा मिळेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १८ किंवा २५ सप्टेंबर रोजी महागाई भत्त्यात ३% वाढ करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळू शकते मात्र, सरकारकडून अद्याप कोणताही अजेंडा देण्यात आलेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button