breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#Covid-19: Johnson & Johnson कंंपनी कोरोना लसीच्या क्लिनिकल चाचणीच्या अंतिम टप्प्यात- ट्रंप

नवी दिल्ली: कोरोना लसीच्या संंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांंनी एक महत्वपुर्ण माहिती व्हाईट हाऊस मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिलेली आहे. ट्रंप यांंच्या माहितीनुसार, अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन या कंंपनीची करोनावरील संभाव्य लस वैद्यकीय चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. ही अमेरिकेतील चौथी लस आहे जी क्लिनिकल चाचणीच्या चौथ्या टप्प्यात पोहचलेली आहे. या लसीच्या चाचण्यांंसाठी अमेरिकन नागरिकांंनी प्रतिनिधित्व करण्यासाठी नोंंदणी करावी असेही आवाहन ट्रंप यांंनी केलेले आहे.

ही आपल्या देशासाठी महत्वाची आणि फायद्याची मदत ठरेल असे म्हणत ट्रंप यांंनी नागरिकांंना प्रोत्साहन दिलेले आहे. दुसरीकडे, अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवरुन सुरु असलेल्या राजकारणावरही त्यांंनी भाष्य केलेले आहे. विरोधी पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बिडेन यांंना टार्गेट करत “अमेरिकेत्या इतिहासात आर्थिक सुधारणांना सर्वात वेगानं आम्ही पुढे नेलेल्या आहेत. आमचा वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. परंतु बिडेन हे विज्ञान विरोधी दृष्टीकोन असलेलेल व्यक्ती आहेत,” असंही ट्रम्प म्हणाले आहेत. काही दिवसांपुर्वी जो बिडेन यांनी ट्रंप यांंच्या चीन आणि युरोपच्या प्रवासावर बंदी आणि त्यावर आखण्यात आलेल्या धोरणांचा विरोध केलेला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button