Covid-19 |’कोरोना’लढ्यासाठी पंतप्रधानांची दिग्गजांना फोनाफोनी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/PM-Modi-Manmohan-Sonia-Mamta-Pratibha-Patil.jpg)
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिग्गज नेत्यांना फोन करुन ‘कोरोना’च्या मुद्द्यावर चर्चा केली. दोन माजी राष्ट्रपती आणि दोन माजी पंतप्रधानांना फोन करुन नरेंद्र मोदी यांनी ‘कोरोना’च्या अभूतपूर्व संकटाबाबत बातचीत केली. सोनिया गांधी, मुलायमसिंह यादव यांच्यापासून ममता बॅनर्जी, स्टॅलिन यासारख्या नेत्यांना मोदींनी फोन केला.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि प्रतिभा पाटील यांना नरेंद्र मोदी यांनी फोन केला होता. तर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, तसेच जनता दलाचे दिग्गज नेते आणि माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांच्याशी मोदींनी फोनवरुन संवाद साधला.
याशिवाय, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिजू जनता दलाचे नेते आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, तामिळनाडूतील द्रमुक नेते एमके स्टॅलिन आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल अशा विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही त्यांनी फोन केला होता.