breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

CoronaVirus: CRPF अधिकाऱ्याची कोरोना व्हायरसशी झुंज अपयशी, निमलष्करी दलातील पहिला मृत्यू

करोना व्हायरसमुळे मंगळवारी केंद्रीय राखीव पोलीस दलातील एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. करोना व्हायरसमुळे निमलष्करी दलात झालेला हा पहिला मृत्यू झाला. देशातील निमलष्करी दल केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येतात. देशांतर्गत सुरक्षेबरोबर सीमारेषेवर सीआरपीएफच्या जवानांची तैनाती केली जाते. एका वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे.

करोना व्हायरसची लागण झाल्यामुळे दिल्लीतील एका रुग्णालयात सहाय्यक निरीक्षक पदावरील सीआरपीएफच्या अधिकाऱ्यावर उपचार सुरु होते. दिल्लीत असलेल्या सीआरपीएफच्या बटालियनमध्ये हा अधिकारी तैनात होता.

बीएसएफ, सीआयएसएफमध्येही काही जणांना करोनाची लागण झाली आहे. सीआरपीएफ हे देशातील सर्वात मोठे निमलष्करी दल आहे. जवान आणि अधिकारी मिळून सीआरपीएफमध्ये ३.२५ लाख कर्मचारी आहेत. नक्षलवाद आणि काश्मीर खोऱ्यात दहशतवाद विरोधी मोहिमांमध्ये सीआरपीएफचा सहभाग असतो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button