Breaking-newsटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडी
#CoronaVirus | 55 लाख वेळा डाऊनलाेड ‘आराेग्य सेतू’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/setu.jpg)
नवी दिल्ली | काेराेनाच्या संकटामुळे लाॅकडाऊनदरम्यान भारतीय आराेग्याबाबत सर्वाधिक जागरूक झाले आहेत. त्याशिवाय भारतात व्हिडिआे चॅट व गेमिंगचाही जाेरदार वापर केला जात आहे. एका आठवड्यात आराेग्य सेतू अॅप ५५ लाख वेळा डाऊनलाेड करण्यात आले आहे.
दुसरीकडे व्हिडिआे चॅट अॅपला आठवडाभरात ४२ लाखांहून जास्त वेळा डाऊनलाेड करण्यात आले आहे. वेगवेगळ्या अॅपसाठी हा आकडा वेगवेगळा आहे, परंतु आराेग्यविषयक अॅप सर्वाधिक वेळा डाऊनलाेड करण्यात आले. त्याशिवाय गेमिंग व चॅटिंग अॅपचाही वापर वाढला.