#CoronaVirus: 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परिक्षा स्थगित
![Attend Sadenoula's paper of eleven, there will be thermal screening; Rules for students](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/board-exams-1584594992.jpg)
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सीबीएसई बोर्डानंतर आता आयसीएसई आणि आयएससी बोर्डानेही आता परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे… आयसीएसई आणि आयएससी बोर्डानेही 10 वी आणि 12 वीच्या परिक्षा स्थगित केल्या आहेत. या परीक्षा 31 मार्चनंतर घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
बोर्डाकडून शाळांना जारी केलेल्या निर्देशानुसार कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता 19 मार्च ते 31 मार्च दरम्यान घेण्यात येणाऱ्या 10 वी आणि 12 वीचे परीक्षा वेळापत्रक स्थगित करण्यात आले आहे. या परीक्षा 31 मार्चनंतर घेण्यात येणार आहे. सीआयएससीईकडून (CISCE) गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/CBSE_Exam_postponed_March_18-704x1024.jpeg)
दरम्यान, सीबीएसई बोर्डाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बुधवारी 10 वी आणि 12 वीची परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या परीक्षांबाबत 31 मार्चनंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले. तर त्याआधी अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईईची परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली. 31 मार्चनंतर या परीक्षेबाबत नवे वेळापत्रक जारी करण्यात येणार आहे.