#CoronaVirus: १६ परदेशी नागरिकांसह ३० जमातींना अटक
![Three arrested in Karnataka for molesting a woman and assaulting her friends](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/arrest-1-1.jpg)
दिल्लीतील निझामुद्दीन येथील तबलिगी जमातला उपस्थित असलेल्या १६ परदेशी नागरिकांसह २९ जणांना आणि अलाहाबाद विद्यापीठातील एका प्राध्यापकाला अटक करण्यात आल्याचे मंगळवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
येथील मशिदीत तबलिगी जमातच्या परदेशी सदस्यांमधील इंडोनेशियाच्या नागरिकांच्या निवाऱ्याची सोय केल्याबद्दल आणि त्याची माहिती पोलिसांना न दिल्याच्या आरोपावरून प्राध्यापक मोहम्मद शाहीद यांना अटक करण्यात आल्याचे शहर पोलीस अधीक्षक ब्रिजेशकुमार श्रीवास्तव यांनी सांगितले.
इंडोनेशियातील एका नागरिकाला यापूर्वी करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते आणि त्याच्यावर अलहाबाद जिल्ह्य़ातील कोटवा बानी येथे उपचार करण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या अन्य नागरिकांमध्ये थायलंडच्या नऊ, केरळ आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एक यांचा समावेश आहे, तर अन्य ११ जण अब्दुल्ला मशीद आणि हेरा मशीद यांच्याशी संबंधित आहेत.