breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा यांचा कोरोनाविषाणूमुळे मृत्यू

स्पेनमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्याचदरम्यान स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा यांचा कोरोनाविषाणूची लागण होऊन मृत्यू झाला आहे. मारिया टेरेसा यांच्या मृत्यूमुळे राजघराण्यातील व्यक्तीचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू होण्याची जगातील ही पहिलीच घटना आहे.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ८६ वर्षीय राजकुमारी मारिया स्पेनचे राजे फेलिप सहावे यांच्या चुलत बहीण होत्या. त्यांचे भाऊ राजकुमार सिक्टो एनरिक डे बोरबोन यांनी फेसबुकवर राजकुमारी यांच्या निधनाची माहिती दिली. कोरोना विषाणूमुळे आपली बहीण राजकुमारी मारिया यांचे निधन झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे. 

त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, आज दुपारी कोरोना विषाणूमुळे आमची बहीण मारिया टेरेस डे बोरबोन परमा अँड बसेट यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. स्पेनचे राजे फिलिप सहावे यांची कोरोना चाचचणी निगेटिव्ह आल्यानंतर काही आठड्यानंतर राजकुमारी टेरेस यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button