breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: सिंगापूरमध्ये भारतीयांवर गुन्हा

सिंगापूरमध्ये कोविड १९ निर्बंधांचे उल्लंघन केल्याने दहा भारतीय नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात  आले असून त्यांच्यात काही विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील काही जण भाडय़ाच्या खोलीत एकत्र जमले होते. ५ मे रोजी तीन जणांच्या गटाने इतर सात जणांना त्यांच्या सदनिकेत चहापानासाठी बोलावले होते.

त्यात सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करण्यात आले नाही. कोविड १९ निर्बंधानुसार या लोकांनी एकत्र जमून नियमांचे उल्लंघन केले. त्यांना १० हजार सिंगापूर डॉलर्स वा सहा महिने तुरुंगवास अशी शिक्षा होऊ शकते. गुन्ह्य़ात सामील असलेल्यात अविनाश कौर ही महिला, नवदीप सिंग व सजनदीप सिंग यांचा समावेश आहे. त्यांच्यावर इतरांना घरात आणून नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button