breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: भारताला मदतीचे चीनचे आश्वासन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/main-qimg-8e05f5bc3e7b48f2371a0998087a7646.png)
भारताने चीनकडून खरेदी केलेले जलद चाचणी संच सदोष निघाले असले तरी आम्ही भारताला याबाबत योग्य ती मदत करू असे आश्वासन चीनने दिले आहे. चीनच्या भारतीय दूतावासातील अधिकारी जी रोंग यांनी सांगितले की, जलद चाचणी संच सदोष निघाल्याची माहिती आम्हाला समजली आहे. आमचा देश उत्पादनांच्या दर्जाला विशेष महत्त्व देतो. निर्यात वैद्यकीय उपकरणांनाही ही गोष्ट लागू आहे. त्यामुळे भारताला दिलेले जे संच सदोष निघाले आहेत त्याबाबत भारताला निश्चित मदत केली जाईल.