breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: पॅरासिटेमॉलच्या ३० लाख गोळ्यांचा आज ब्रिटनला पुरवठा

भारताने ब्रिटनला ३० लाख पॅरासिटेमॉलच्या गोळ्या पाठवल्या असून त्या रविवारी त्यांना मिळणार आहेत. या मदतीसाठी ब्रिटनने भारताचे आभार मानले आहेत.

ब्रिटनचे दक्षिण आशियाविषयक मंत्री लॉर्ड तारिक अहमद यांनी सांगितले की, ही मदत दोन्ही देशांतील संबंधांसाठी महत्त्वाची असून सहकार्याचे प्रतीक आहे. जागतिक पेचप्रसंगाच्या काळात दोन देश एकमेकांना मदत करू शकतात हे यातून स्पष्ट झाले आहे. भारत व ब्रिटन हे दोन देश करोनाच्या प्रतिबंधासाठी एकमेकांना मदत करतील यात शंका नाही. ब्रिटनच्या वतीने आपण भारत सरकारचे आभार मानतो.

ब्रिटनचे जे लोक भारतात आहेत त्यांना परत नेण्यासाठी  सरकारने ज्या विमानांची व्यवस्था केली आहे त्याच विमानांमधून या गोळ्या व इतर वैद्यकीय मदत पाठवण्यात येत आहे ती रविवारी त्यांना मिळेल.

ब्रिटनचे नागरिक हे गोवा, मुंबई, दिल्ली, अमृतसर, अहमदाबाद, तिरुअनंतपूरम, कोची, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई, बेंगळूरु येथून पुढील आठवडय़ात विमानाने मायदेशी जाणार आहेत. त्यांची लक्षणे तपासून मगच त्यांना सोडण्यात येणार आहे.

ब्रिटनमध्ये  गेल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवले जाणार असून ब्रिटनचे २१ हजार नागरिक सध्या भारतात आहेत. त्यातील पाच हजार या आठवडाअखेरीस व उरलेले पुढील आठवडय़ात मायदेशी जातील, पुढील आठवडय़ात १९ विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे.

ब्रिटनमध्ये आतापर्यंत करोनाचे ८ हजाराहून अधिक बळी गेले असून ६५ हजार रुग्ण आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button