breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

#CoronaVirus: पाण्याच्या बॉटल पेक्षाही कमी दरात मिळणार COVAXIN लस! जगातली सर्वात स्वस्त वॅक्सिन देण्याचा भारत बायोटेकचा मानस

तेलंगणा: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. दुसरीकडे जगभरातील सर्वच देश कोरोनावर लस शोधण्याच्या प्रयत्नात आहे. भारतातही यात मागे नाही आहे. भारतात कोरोनाची लस तयार करण्याचं काम भारत बायोटेक या कंपनीकडून सुरू आहे. भारत बायोटेकच्या वतीने कोवाक्सिन (COVAXIN) ही लस तयार केली जाणार आहे. ही लस सध्या मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात आहे. या चाचणीचा दुसरा टप्पा सप्टेंबरपासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान ही लस पाण्याच्या बॉटेलपेक्षाही कमी किंमतीत देण्याचे आमचे मानस असल्याचे भारत बायोटेक कंपनीच्या वतीने सांगण्यात आलेले आहे. तेलंगणाचे मंत्री के तारका यांनी भारत बायोटेक कंपनीला भेट दिलेली होती. यावेळी त्यांनी कोरोना लशीच्या प्रगतीबाबत चर्चा केलेली आहे. यावेळी कंपनीचे संचालक कृष्णा एला यांनी, कोरोनाशी लढण्यासाठी आम्ही तयार आहोत. जागतिक आरोग्य संघटना कोवाक्सिनला पाठिंबा देत आहे. ही लस कमीत कमी किंमतीत लोकांपर्यंत पोहचवावी, हे आमचे उद्दिष्ट असल्याचेही यावेळी कृष्णा एला म्हणाले आहेत. दरम्यान कोवाक्सिन लस कधीपर्यंत बाजारात उपलब्ध होईल याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही आहे. मात्र या लसीचे आतापर्यंत झालेल्या तपासणीत चांगले रिपोर्ट आलेले आहेत. या लसीचा प्रयोग स्वयंसेवकांवर करण्यात आलेला आहे. याचे परिणाम चांगले दिसून आलेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button