breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: नीती आयोगाचा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, इमारत केली सील
![Pune Divisional Commissioner also corona positive; The corona is growing rapidly](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/covid-19-2.jpg)
नीती आयोगाचा कर्मचारी करोना पॉझिटिव्ह ठरल्याने दिल्लीतील ही इमारत सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सकाळी ९ वाजता इमातीमधील कर्मचारी करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने नीती आयोग भवन ही इमारत दोन दिवसांसाठी सील करण्याचा निर्णय झाला आहे.
“नीती आयोग भवनाच्या इमारतीतील कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळल्याने आम्ही आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सगळ्या निर्देशांचे पालन करतो आहोत. ही इमारत तातडीने सील करण्यात आली आहे. तसंच या इमारतीचं सॅनिटायझेशनही करण्यात येतं आहे. ज्या कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे त्याच्या संपर्कात आलेल्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे.” अशी माहिती नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली