breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
#CoronaVirus | ‘नासा’कडून व्हेंटिलेटर विकसित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Washingtone.jpg)
वॉशिंग्टन | खास ‘कोव्हिड १९’च्या रुग्णांसाठी अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेने (नासा) विशेष उच्च दाबयुक्त व्हेंटिलेटर तयार केला आहे. व्हेंटिलेटर इंटरव्हेन्शन टेक्नॉलॉजी अॅक्सेसिबल लोकली (व्हायटल) असे नाव या यंत्राला देण्यात आले आहे, अशी माहिती ‘नासा’च्या वतीने देण्यात आली. ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत, अशांसाठी हे उपकरण विकसित करण्यात आले आहे, जेणेकरून गंभीर रुग्णांना हॉस्पिटलमधील अधिकाधिक व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावेत, असे ‘नासा’ने निवेदनात स्पष्ट केले आहे.
गेल्या आठवड्यात या उपकरणाची वैद्यकीय चाचणी न्यूयॉर्कमधील इकान स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये करण्यात आली असून, ती यशस्वी ठरली आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.