breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus: नाशिक महापालिका आयुक्त हायरिस्कमध्ये, स्वीय सहाय्यकाला कोरोना, जिल्हा परिषदेतही शिरकाव

नाशिक : नाशिकमध्ये सरकारी कार्यालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. नाशिक जिल्हा परिषद आणि महापालिकेत कोरोनाने शिरकाव केलेला आहे. जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा विभागाचा क्लार्क कोरोना आढळला आहे. तर महापालिकेच्या नगररचना विभागातील कर्मचाऱ्यालाही कोरोनाची बाधा झाली. दुसरीकडे नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे हे सुद्धा हायरिस्क झोनमध्ये आले आहेत. आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकाला कोरोनाची लागण झाल्याने आयुक्तांसह इतर कर्मचारीदेखील हायरिस्क झोनमध्ये आले आहेत. सरकारी कार्यालये आता कोरोनाच्या विळख्यात सापडू लागल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे.

नाशिकमध्ये रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. जी यंत्रणा कोरोनाविरोधात लढत आहे. तेच आता कोरोनाच्या विळख्यात येताना दिसत आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढला आहे. काल एकाच दिवसात तब्बल 124 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर 14 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आता शहरवासियांची चिंता वाढू लागली आहे. दिवसागणिक नाशिक शहरात, ग्रामीण भागात कोरोना रुग्ण समोर येत असल्याने प्रशासनाचीही धावपळ उडालेली आहे. त्यात नाशिक शहर आता कोरोना हॉटस्पॉट झाल्याने जिल्हा आरोग्य विभागही चिंतेच्या गर्तेत अडकला आहे.

जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा आता 2998 वर जाऊन पोहोचला आहे. यात नाशिक शहरातील रुग्ण संख्याच बाराशेच्या वर गेली आहे. मात्र स्थानिक नागरिकांनी धोका लक्षात घेता शहरातील अनेक भाग स्वयंस्फूर्तीने बंद ठेवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button