breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

#CoronaVirus | नागपुरात धोका वाढला, 12 तासांत 14 रुग्ण

नागपूर | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. नागपुरात 12 तासांत तब्बल 14 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे 14 जण दिल्लीतील मरकजहून परतले होते. त्यांना नागपूरच्या आमदार निवास येथे क्वारंटाईन करण्यात आलं होतं. रविवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. यातील 9 नागपूर शहरातील, 1 नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील तर 4 मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.

नागपुरात आता कोरोना बधितांचा आकडा 41 वर गेला आहे. 8 जण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, एकाच दिवशी 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासन आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. यावर खबरदारी म्हणून नागपूर पालिकेकडून रुग्ण सापडलेला परिसर सील करण्यात आला असून, या रुग्णांच्या संपर्कात कोणी आलं होतं का याचा तपास सध्या सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात तब्बल 134 रुग्णांची संख्या वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 113 रुग्ण हे मुंबईतच आढळले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button