breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Coronavirus : देशात २४ तासांत ९,९७१ रुग्ण

नवी दिल्ली : देशात करोना रुग्णवाढ कायम आहे. गेल्या २४ तासांत ९,९७१ नवे रुग्ण आढळल्याने देशातील एकूण रुग्णसंख्या दोन लाख ४६ हजार ६२८ झाली आहे. गेल्या २४ तासांत करोनाने २८७ जणांचा बळी घेतल्याने मृतांचा एकूण आकडा ६,९२९ वर पोहोचला आहे.

गेल्या आठवडय़ाभरापासून करोना रुग्णांच्या संख्येत प्रतिदिन सात ते नऊ हजारांची भर पडत आहे. गेले सलग तीन दिवस १० हजारांनजीक रुग्णवाढ नोंदविण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १ लाख १९ हजार २९३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात किंचित वाढ झाली असून ते ४८.२० टक्क्यांवरून ४८.३६ टक्क्यांवर गेले आहे. देशात रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असली तरी, राष्ट्रीय स्तरावर समूह संसर्ग झाला नसल्याचे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.  देशात गेल्या १० दिवसांत सुमारे २ हजार रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button