breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: डॉक्टरांसह ५४८ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग
![In the second wave of corona, 646 doctors lost their lives - IMA](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/ppe-kits.jpg)
केंद्र व राज्य सरकारच्या रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी यांच्यासह देशात ५४८ आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. केंद्र सरकारने गोळा केलेल्या माहितीच्या आधारे हा आकडा देण्यात आला आहे. यात प्रत्यक्ष आरोग्य तपासणी करणारे कर्मचारी, वॉर्ड बॉय, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शिपाई, स्वयंपाक कर्मचारी यांच्या माहितीचा समावेश नाही.