breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

Coronavirus: टॉयलेट पेपरचा तुटवडा झाल्याने वृत्तपत्राने वाढवली पानांची संख्या

करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी प्रत्येक देशाने आपल्या नागरिकांसाटी विशेष सूचना केल्या आहेत. सोबतच सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचं आवाहनही वारंवार करण्यात येत आहे. मात्र लोकांमध्ये भीती निर्माण झाली असल्याने अनेक जीवनाश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. याशिवाय सॅनिटायजर, टॉयलेट पेपर यासारख्या गोष्टींचाही तुटवडा भासू लागला आहे.

विशेष म्हणजे सोशल मीडियावर #ToiletPaperEmergency #ToiletPaperApocalypse हे हॅशटॅग ट्रेडिंग होत आहेत. ऑस्ट्रेलियातील नागरिकांसमोर टॉयलेट पेपरचा तुटवडा निर्माण झाला असल्याने मोठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, एनटी न्यूज या वृत्तपत्राने लोकांची टॉयलेट पेपरची समस्या सोडवण्यासाठी पानांची संख्या वाढवली आहे. तुमचा विश्वास बसत नसेल, पण हे खरं आहे.

वृत्तपत्राने आपल्या ट्विटर अकाऊंटवर याचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. या व्हिडीओला त्यांनी हो आम्ही खऱंच केलं आहे (Yes, we actually did it) अशी कॅप्शनही दिली आहे. यावेळी त्यांनी #toiletpapercrisis हा हॅशटॅगही वापरला आहे.

वृत्तपत्राने एकूण आठ पानं वाढवली असून ही पानं कापून त्यांचा टॉयलेट पेपर म्हणून वापर केला जाऊ शकतो. ऑस्ट्रेलियामध्ये टॉयलेट पेपरची निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्यांमध्ये तुटवडा निर्माण झाला असल्याने वृत्तपत्राकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून लोकांनी आपली गरज जाणून घेतल्याबद्दल वृत्तपत्राचे आभार मानले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button