breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
#CoronaVirus: टाळेबंदी असताना चोरून मद्य विक्री करणाऱ्या २१ विक्रेत्यांना सांगलीत अटक
![Gujarat government president arrested in Rs 10 crore scam](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/arrested.jpg)
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात सर्व मद्य विक्री बंद करण्यात आली असल्याने तळीरामांच्या सोयीसाठी चोरून सुरू असलेली मद्य विक्री थोपविण्यासाठी राज्य उत्पादन विभागाने वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून सुमारे अडीच लाखाचे मद्य जप्त करून २१ मद्य विक्रेत्यांना अटक केली आहे. तसेच टाळेबंदीच्या काळामध्ये अकारण रस्त्यावर येणाऱ्या २५ मोटारींसह सुमारे सव्वा तीन हजार वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली.