#CoronaVirus | जम्मू-काश्मीरमध्ये 8 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/corona-new.jpg)
श्रीनगर | भारतात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आतापर्यंत 700 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या दरम्यान जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे एका 8 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. आठ महिन्याच्या बाळाला कोरोना झाल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
या आठ वर्षीय बाळाचे कुटुंब नुकतेच सौदी अरबवरुन भारतात परतले. या लहान बाळाच्या कुटुंबियांनाही कोरोनाची लागण झाली आहे. श्रीनगरमधील रुग्णालयात या कुटुंबाला दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
कोरोना विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत जगभरात 5 लाखांपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार जगभरात सर्वाधिक रुग्ण हे अमेरिकेत आहेत. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 82 हजार 400 वर पोहोचली आहे. तर चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 81 हजार 700 आणि इटलीमध्ये 80 हजार 500 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.