breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: जगातील बळी ३८ हजारांपार
जगभरात करोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या मंगळवारी ३८ हजार ४६६ इतकी झाली. इटलीमध्ये ११,५९१ लोकांचा मृत्यू झाला असून १,०१,७३९ लोकांना करोनाची लागण झाली आहे. स्पेनमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल ८४९ बळी गेल्यामुळे त्या देशातील बळींची संख्या ८ हजार १८९ झाली आहे, तर तेथील ९४,४१७ लोक करोनाबाधित आहेत.