breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: जगातील बळींची संख्या १,४२,७०७

करोनाबाधित रुग्णांच्या सतत संपर्कात आल्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्याची लागण होण्याची सर्वाधिक शक्यता असते. त्यामुळे फ्रान्समध्ये गुरुवारी प्रमुख रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली.

जगभरात करोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या गुरुवारी १ लाख ४२ हजार ७०७ पर्यंत पोहचल्याचे एएफपी या वृत्तसंस्थेने अधिकृत सूत्रांकडून मिळवलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

गेल्या डिसेंबमध्ये सर्वप्रथम चीनमध्ये या महासाथीचा उगम झाल्यापासून १९३ देशांमध्ये करोनाबाधितांची २१,२९,३७८ हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यापैकी किमान ५,३९,००० लोक बरे झाल्याचे मानले जात आहे. विविध देशांतील अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळालेली माहिती या आधारे या वृत्तसंस्थेने ही आकडेवारी संकलित केली आहे. अनेक देश अद्याप अतिशय गंभीर प्रकरणांची चाचणीच करत आहेत

या महासाथीचा केंद्रबिंदू ठरलेल्या अमेरिकेत बळीसंख्या ३० हजार ९८५ झाली असून, ६,३९,६६४ लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. तेथे किमान ५०,१०७ लोक बरे झाले आहेत.

याखालोखाल फटका बसलेल्या देशांत इटलीचा क्रमांक आहे. तेथे २१,६४५ बळी गेले असून, १,६५,१५५ लोकांना संसर्ग झाला आहे. स्पेनमध्ये १,८२,८१६ लोक करोनाबाधित असून, १९,१३० लोकांचा मृत्यू झाला आहे.

फ्रान्समधील करोनाबळींची संख्या १७,१६७ तर संसर्ग झालेल्यांची संख्या १,४७,८६३ इतकी आहे. ब्रिटनमध्ये ९८,४७६ लोक करोनाबाधित असून, तेथे १२,८६८ जणांचे बळी गेले आहेत. चीनने आतापर्यंत ३३४२ बळी जाहीर केले असून ८२,३४१ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले आहे. तेथे ७७,९८२ लोक बरे झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button