Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus | कोरोनारूग्णांच्या आकड्यात भारताने चीनला टाकलं माग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/coronavirus-890x395-3.png)
नवी दिल्ली | भारतात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आपण चीनला मागे टाकलंय. ताज्या आकडेवारीनुसार भारतात कोरोनाबाधितांची संख्या 83072 झाली असून चीनमध्ये 82933 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. वेबसाईट worldometers.info नुसार ही आकडेवारी समोर आलीय. आज चीन जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या पहिल्या दहा देशांच्या यादीतून बाहेर गेलाय. या यादीमध्ये भारत अकराव्या स्थानावर तर चीन बाराव्या स्थानावर आहे. एकीकडे भारतात रुग्णांची संख्या कमालीची वाढत असताना चीनमध्ये खूपच कमी रुग्ण सापडत असल्याचं दिसून आलंय.