breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: कोरोनामुळे देशात पहिल्यांदा एका डॉक्टरचा मृत्यू

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या बरोबरच इंदूरमधील मृतांची संख्या २२ वर पोहोचली आहे. मध्य प्रदेशात इंदूरमध्येच सर्वात जास्त कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. इंदूरमध्ये करोनाबाधितांची संख्या आता २१३ वर पोहोचली आहे.

डॉ. शत्रुघ्न पंजवानी असे कोरोनाने मत्यू पावलेल्या डॉक्टरचे नाव असून त्यांच्यावर गोकुलदास येथे उपचार सुरू होते, अशी माहिती आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण जडिया यांनी सांगितले आहे. डॉ. पंजवानी यांना गोकुलदासमधून अरविंदोमध्ये हलवण्यात आलं होतं. त्यांची तब्येत नाजूक होती. आज सकाळी त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. डॉ. पंजवानी हे इंदूरमधील रुपराम नगर येथे राहात होते.

कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे इंदूरला पूर्णपणे सील करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील कोरोनामुळे पहिल्यांदाच डॉक्टचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरच्या मृत्यूनंतर इंदूरमध्ये वैद्यकीय कर्मचारी आता अधिक खबरदारी घेत आहेत. तसेच कोरोना पीडितांवर उपचार करत असलेले डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ यांचे प्रशासनही विशेष काळजी घेत आहे. डॉ. पंजवानी यांना कोरोनाग्रस्तावर उपचार करत असतानाच कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सांगण्यात येत आहे.

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. बुधवारी देखील इंदूरमध्ये ४० कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. या बरोबरच इंदूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या २१३ वर पोहोचली आहे. आतापर्यंत इंदूरमध्ये कोरोनामुळे एकूण २२ लोकांचा मृत्यू झाला आहे. इंदूरमधील हॉटसॉट ठरलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button