#CoronaVirus: कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर, फ्रान्सलाही टाकलं मागे
![# Covid-19: Decline in the number of active patients in the country, today only 1,84,408 active patients - Ministry of Health](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/coronavirus_topic_header_1024.jpg)
करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या पहिल्या १० देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतामध्ये रविवारी रात्रीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार करोनाचे १ लाख ९० हजार ६०९ रुग्ण आहेत. यासोबत भारताने फ्रान्सला मागे टाकलं आहे. फ्रान्समध्ये करोनाचे १ लाख ८८ हजार ८८२ रुग्ण असून भारताने फ्रान्सला मागे टाकलं असून नवव्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका अद्याप कायम असून अमेरिकेत करोनाचे १८ लाख रुग्ण आहेत. यानंर ब्राझील आणि रशियाचा क्रमांक आहे. ब्राझीलमध्ये करोनाचे पाच लाख तर रशियात करोनाचे चार लाख रुग्ण आहेत.
रविवारी देशात करोनाच्या ८३८० नव्या रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. एका दिवसात पहिल्यांदाच आठ हजाराचा आकडा पार झाला आहे. करोनाच्या रुग्णांच्या मृत्यूंची संख्यादेखील पाच हजारहून जास्त झाली असून गेल्या चोवीस तासांमध्ये १९३ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण ५,१६४ रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांमध्ये ४,१६४ रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण ४७.७६ टक्के आहे. देशभरात ८९,९९५ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. देशात गेल्या तीन दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसत आहे. एकीकडे भारत गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेला लॉकडाउन शिथील करत असतानाच करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता वाढली आहे.
कोणता देश कोणत्या क्रमांकावर –
पहिल्या क्रमांकावर ब्राझिल असून त्यानंतर अनुक्रमे ब्राझिल, रशिया, स्पेन, इंग्लंड, इटली आणि त्यानंतर भारताचा क्रमांक आहे.