Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: आंतरराष्ट्रीय विमानसेवेसंबंधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/images-3-1.jpeg)
देशांतर्गत प्रवासी विमानसेवा टप्याटप्याने सुरु करण्यात येत असताना आंतरराष्ट्रीय विमानसेवा मात्र अद्यापही सुरु झालेली नाहीये. जगावर असलेलं कोरोनाचं संकट अद्यापही कमी झालेलं नाहीये. यामुळे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे १५ जुलैपर्यंत प्रस्तावित असणारी सर्व आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांची उड्डाणं देखील रद्द असणार आहेत.
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने यासंबंधी आदेश जारी केलेला आहे. आदेशात देण्यात आलेल्या माहितीनुसार, हा आदेश आंतरराष्ट्रीय कार्गो ऑपररेशन तसंच नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून संमती मिळालेल्या विमानांना लागू असणार नाहीये.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/ebbxadru8aar-fj52573618-696x1024.jpeg)