२०१७ मध्ये सर्वाधिक जिल्ह्यात काँग्रेसची मुसंडी, मग भाजपाने कशी सत्ता स्थापन केली?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Politics.png)
नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
२०१७ च्या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसला हार पत्करावी लागली होती. मात्र तरीही भाजपासोबत त्यांची कडवी झुंज झाली होती. त्यावर एक दृष्टीक्षेप टाकुयात. कोणत्या जिल्ह्यात भाजपा आणि कोणत्या जिल्ह्यात काँग्रेस जिंकली यावर एक दृष्टीक्षेप टाकुयात.
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. २०१७ प्रमाणेच यंदाही गुजरातमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस यांच्यात काँटे की टक्कर झाली होती. तर यंदाच्या निवडणुकीत भाजपा (BJP), काँग्रेस आणि आप अशी तिहेरी निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
२०१७ च्या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस यांच्यात लढत झाली होती. काँग्रेसने सर्वाधिक जिल्ह्यांत जागा जिंकल्या होत्या. मात्र तरीही सत्ता स्थापन करण्यास भाजपाला यश मिळालं. तर, काँग्रेसला निसटती हार पत्करावी लागली होती. त्यावर एक दृष्टीक्षेप टाकुयात. कोणत्या जिल्ह्यात भाजपा आणि कोणत्या जिल्ह्यात काँग्रेस जिंकली यावर एक दृष्टीक्षेप टाकुयात.
बहुमतासाठी ९२ जागांची गरज
गुजरातमध्ये एकूण १८२ विधानसभेच्या जागा आहेत. बहुमतासाठी ९२ जागांची गरज असते. २०१७ च्या निवडणुकीत भाजपाला ९९, काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. ६ जागा अपक्षांना मिळाल्या होत्या. राज्यातील जागांवर क्षेत्रवार नजर टाकल्यास मध्य गुजरातमध्ये ६८, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये ५४, उत्तर गुजरातमध्ये ३२ आणि दक्षिण गुजरातमध्ये २८ जागा आहेत.
मध्य गुजरातमध्ये भाजपाला मोठं बळ
मध्य गुजरातच्या ६८ जागांपैकी ४० जागांवर भाजपाने जागा मिळावली होती. तर, काँग्रेसला २४ जागा मिळाल्या होत्या. तर अन्य चार जागांवर अपक्ष उमेदवार जिंकून आले होते. म्हणजेच, मध्य गुजरातमध्ये भाजपाला मोठं बळ मिळालं होतं. कच्छ-सौराष्ट्र भागात काँग्रेसने भाजपावर मात केली होती. ५४ पैकी ३० जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता तर, भाजपाने २३ जागांवर विजय मिळवला होता. तर एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली होती.
उत्तर गुजरातमध्ये काँटे की टक्कर
उत्तर गुजरातमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर झाली होती. या भागात ३२ पैकी १७ जागा काँग्रेसच्या वाट्याला तर, १४ जागा भाजपाला मिळाल्या होत्या. तर, एका जागेवर काँग्रेस समर्थक अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांचा विजय झाला होता. दक्षिण गुजरातमध्ये भाजपाने एकतर्फी विजय मिळवला होता. तेथील २८ पैकी २२ जागावंर भाजपाने जागा काबुत केली तर, बाकीच्या सहा जागांवर काँग्रेसने विजय मिळवला.