फ्रान्सच्या चर्चमध्ये तब्बल ३ लाख ३३ हजार मुलांचं लैंगिक शोषण, शेकडो धर्मगुरुंचा सहभाग; अहवालातून माहिती उघड
नवी दिल्ली |
फ्रान्सच्या कॅथोलिक चर्चमध्ये अंदाजे तीन लाख ३० हजार मुले गेल्या ७० वर्षांमध्ये लैंगिक शोषणाला बळी पडली आहेत अशी माहिती मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या एका प्रमुख फ्रेंच अहवालात आढळून आली आहे. पहिल्यांदाच फ्रान्समध्ये एवढ्या प्रमाणात अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. जे मुलांवर घाणेरडी नजर ठेवतात, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात त्यांना पीडोफाइल म्हणतात. १९५० पासून फ्रान्सच्या कॅथोलिक चर्चमध्ये हजारो पीडोफाइल सक्रिय होते. फ्रान्सच्या चर्चमध्ये बाल लैंगिक शोषणाच्या प्रकरणांच्या तपासात गुंतलेल्या स्वतंत्र आयोगाने ही माहिती दिली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अहवाल जारी करणारे आयोगाचे अध्यक्ष, जीन-मार्क सॉवे यांनी याबाबत माहिती दिली आहे. “वैज्ञानिक संशोधनाच्या आधारावर या अनुमानात फादर तसेच चर्चमध्ये सामील नसलेल्या धर्मगुरूंनी केलेल्या गैरवर्तनांचा समावेश आहे. यामध्ये सुमारे ८० टक्के पुरुष पीडित आहेत. हे खूपच भयंकर आहे. लैंगिक शोषण झालेल्या सुमारे ६० टक्के पुरुष आणि स्त्रियांना त्यांच्या भावनिक किंवा लैंगिक जीवनात मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते,” असे सॉवे म्हणाले.
स्वतंत्र आयोगाने तयार केलेल्या २,५०० पानांच्या अहवालाने इतर देशांप्रमाणेच फ्रान्समधील कॅथोलिक चर्चने लपवलेला हा धक्कादायक प्रकार समोर आणला आहे. अहवालात म्हटले आहे की अंदाजे बाल लैगिंक अत्याचार करणाऱ्या ३,००० लोकांमध्ये दोन तृतीयांश धर्मगुरु होते जे त्या काळात चर्चमध्ये काम करत होते. पीडितांच्या एकूण आकडेवारीमध्ये पुजारी आणि इतर धर्मगुरुंनी गैरवर्तन केलेल्या अंदाजे २१६,००० लोकांचा समावेश आहे. तपासात योगदान देणाऱ्या “पार्लर एट रिव्हियर” (स्पीक आऊट अँड लिव्ह अगेन) चे पीडित असोसिएशनचे प्रमुख ऑलिव्हियर सॅविनाक यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, प्रति अत्याचार पीडितांचे हे प्रमाण विशेषतः फ्रेंच समाजासाठी, कॅथोलिक चर्चसाठी भयानक आहे. आयोगाने अडीच वर्षे काम केले. पीडितांचे आणि साक्षीदारांचे ऐकणे आणि १९५० च्या दशकात चर्च, न्यायालय, पोलीस आणि माध्यमांचा अभ्यास केला आहे. तपासाच्या सुरुवातीला सुरू करण्यात आलेल्या हॉटलाईनला कथित पीडितांकडून किंवा जे पीडितांना ओळखले अशा लोकांचे ६,५०० कॉल्स आले.
सॉवे यांनी २००० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत पीडितांबाबत असलेली चर्चचा दृष्टिकोन आणि उदासीनतेचा निषेध केला आहे. ते विश्वास ठेवत नव्हते किंवा ऐकत नव्हते यामुळे त्यांनी खेद व्यक्त केला. सॉवे म्हणाले की, २२ कथित गुन्हे ज्याचा अद्याप पाठपुरावा केला जाऊ शकतो त्यांना वकिलांकडे पाठवण्यात आले आहे. ४० हून अधिक प्रकरणे जी खूप जुनी आहेत पण कथित गुन्हेगार जे अद्याप जिवंत आहेत त्यांना चर्च अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहे. गैरप्रकार कसा रोखता येईल याविषयी आयोगाने ४५ शिफारसी जारी केल्या आहेत. कॅनन कायद्यात सुधारणा करणे. व्हॅटिकन चर्चचा वापर करण्यासाठी कायदेशीर संहिता आणि पीडितांना ओळखण्यासाठी आणि भरपाईसाठी धोरणांना प्रोत्साहन देणे यामध्ये समावेश आहे. सॉवे म्हणाले की, प्रशिक्षण पुजारी आणि इतर कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. फ्रेंच कॅथोलिक चर्चला हादरवून टाकणाऱ्या पास्टर बर्नार्ड प्रेनॉट यांच्या घोटाळ्यानंतर हा अहवाल आला आहे. गेल्या वर्षी, प्रेनॉटला अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते आणि त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास देण्यात आला होता. त्याने दशकांपासून ७५ हून अधिक मुलांवर अत्याचार केल्याची कबुली दिली. प्रेनॉट प्रकरणामुळे गेल्या वर्षी लियोनचे माजी आर्कबिशप कार्डिनल फिलिप बार्बरीन यांनी राजीनामा दिला. ज्यावर २०१० मध्ये त्यांच्यावर गैरवर्तन प्रकरणी अहवाल देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप होता. फ्रान्सच्या सर्वोच्च न्यायालयाने या वर्षाच्या सुरुवातीला असा निर्णय दिला की बार्बेरियनने हे प्रकरण तपासले नाही.