breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

China Vs India: चिनी नागरिकांसाठी ३००० भारतीय हॉटेलांचे दरवाजे बंद

पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांच्या चकमकीत २० भारतीयांना हौतात्म्य आलं होतं. त्यानंतर भारत चीन दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला असून, सर्वच भारतीयांच्या मनात चीनविषयी तीव्र भावना निर्माण झालेल्या आहेत. देशभरात चिनी वस्तुंचा बहिष्कार करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होतेय. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी Boycott Chinese Product अशी मोहिम देखील राबवली आहे.

याच दरम्यान, राजधानी दिल्लीत ‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’कडून (CAIT) चिनी वस्तुंच्या बहिष्काराचं समर्थन करण्यात आले आहे. त्यासोबतच (CAIT) या संघटनेकडून दिल्लीतील ३००० बजेट हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये यापुढे चिनी नागरिकांना राहण्याची परवानगी दिली जाणार नाहीये. या हॉटेल आणि गेस्ट हाऊसचे जवळपास ७५ हजार खोल्या आहेत. गुरुवारी बजेट हॉटेल्सच्या संघटना असलेल्या ‘दिल्ली हॉटेल अँड गेस्ट हाऊस ओनर्स असोसिएशन’नं (धुर्वा) या निर्णयाची घोषणा केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button