Gold Price | सोन्या-चांदीच्या दरात बदल; जाणून घ्या १० ग्रॅमचा भाव

Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. आज गुरुवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे निदर्शनास आले असून, चांदीच्या दरातही काही प्रमाणात फेरफार झाला आहे. बुलियन मार्केटच्या ताज्या आकडेवारीनुसार, १० एप्रिल २०२५ रोजी देशात २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी ८९,८३० रुपये इतका आहे. त्याचबरोबर २२ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा दर ८२,३४४ रुपये नोंदवला गेला आहे.
चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर, आज १ किलो चांदीची किंमत ९१,९४० रुपये आहे, तर १० ग्रॅम चांदीचा दर ९१९ रुपये इतका आहे. सोन्या-चांदीच्या किमतीत होणारे हे बदल उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क यांमुळे भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी भिन्न असू शकतात, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.
हेही वाचा : शेतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्तेला प्राधान्य; कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात कधी वाढ तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदार आणि ग्राहक या चढ-उतारांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. बाजारातील या घडामोडींचा परिणाम दागिन्यांच्या किमतींवरही होत असून, ग्राहकांसाठी आजचे हे लेटेस्ट दर महत्त्वाचे ठरत आहेत.