TOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

दीड वर्षात प्रथमच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून बीएसएफ जवानांवर गोळीबार

तब्बल दीड वर्षांनंतर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला आहे. युद्धविराम करारानंतर गोळीबार थांबवण्यात आला होता. मात्र, आज पाक रेंजर्सनी अरनिया सेक्टरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर गोळीबार केला. बीएसएफ जवानांनीही गोळीबार करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

बीएसएफ जवान गस्त घालत असताना पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार

बीएसएफच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी बीएसएफचे जवान गस्त घालत असताना पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार सुरू केला. याला भारतीय जवानांनी वेळीच चोख प्रत्युत्तर दिले.सुदैवाने या हल्ल्यात बीएसएफच्या कोणत्याही जवानाला कोणतीही दुखापत झालेली नाही.

भारतीय जवानांकडून पाकिस्तानी दहशतवाद्याला रक्तदान

२१ ऑगस्टच्या रात्री राजोरीतील नियंत्रण रेषेवरील नौशेरा सेक्टरमध्ये फिदायन पथकासह घुसखोरी करताना करण्यात आलेल्या कारवाईत तबरक हुसैन (३२) नावाच्या दहशतवाद्याला गोळी लागली होती. उपचारासाठी त्याला भारतीय हद्दीतील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गोळी लागल्यामुळे तबरकचे मोठ्या प्रमाणात रक्त वाया गेले होते. भारतीय लष्कराच्या जवानांनी त्याला आपले रक्त देऊन वाचवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, उपचारादरम्यान ३ सप्टेंबर रोजी हद्यविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.

पाकिस्तानने दहशतवाद्याचा मृतहेह स्विकारला

मृत्यूनंतर तबरकचा मृतदेह पाकिस्ताच्या ताब्यात देण्यात आला. तीन दशकानंतर पहिल्यांदा पाकिस्तानने एका दहशतवाद्याचा मृतदेह आपला नागरिक म्हणून परत स्विकारला. अन्यथा यापूर्वी पाकिस्तानी लष्कर आणि एजन्सीकडून दहशतवाद्यांचा मृतदेह स्विकारण्यास नकार देण्यात आला आहे. तबरक हा पाकिस्तानी लष्कराचा एजंट आणि अतिरेक्यांचा उच्च प्रशिक्षित मार्गदर्शक होता. लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित कारवायांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button