ताज्या घडामोडीदेश-विदेश

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना दिल्लीतल्या अपोलो रुग्णालयात दाखल

लोकसभेत सर्वाधिक काळ विरोधी पक्षनेते म्हणून काम करणारे नेते असाही त्यांचा लौकिक

दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना पुन्हा एकदा अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महिन्याभरापूर्वीही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज (६ ऑगस्ट) पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ९६ वर्षीय लालकृष्ण आडवाणी यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे असं सांगण्यात आलं आहे.

लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती बिघडली
लालकृष्ण आडवाणी यांच्यावर डॉ. विनीत सुरी लक्ष ठेवून आहेत. मागील महिन्यातही लालकृष्ण आडवाणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागील महिन्यात त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. २००२ ते २००४ या कालावधीत लालकृष्ण आडवाणी देशाचे उपपंतप्रधान होते. तर १९९९ ते २००४ या कालावधीत लालकृष्ण आडवाणी हे देशाचे गृहमंत्रीही होते.

अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या लालकृष्ण आडवाणींना गेल्या काही दिवसांपासून आरोग्यविषयक तक्रारींचा सामना करावा लागतो आहे. याच वर्षी लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आलं. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ३० मार्च २०२४ या दिवशी लालकृष्ण आडवाणी यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार दिला. या औपचारिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह हे देखील उपस्थित होते. याआधी २०१५ लालकृष्ण आडवाणी यांना पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आलं होतं. लोकसभेत सर्वाधिक काळ विरोधी पक्षनेते म्हणून काम करणारे नेते असाही लालकृष्ण आडवाणी यांचा लौकिक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button